पुणे

पुणे : नदीवरील ढापे चोरणार्‍यास अटक

अमृता चौगुले

मांडवगण फराटा, पुढारी वृत्तसेवा : इनामगाव (ता. शिरूर) येथील बंधार्‍याचे ढापे चोरीप्रकरणी शिरूर पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून, मुद्देमालही जप्त केला आहे.

घोड नदीपात्रावर इनामगाव येथे बंधारा आहे. बंधार्‍याला नुकतेच पाणी आल्याने सर्व ढापे बाहेर काढून ठेवले आहेत. या ढाप्यांची चोरी करण्याचा प्रयत्न नुकताच झाला होता. मात्र, तो फसल्याने आरोपी वाहन सोडून पळून गेले होते. याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे गरजेचे होते.

त्यानुसार शिरूर पोलिस स्टेशनचे तपास पथक आरोपींच्या मागावर होते. अखेर तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे शिरूर पोलिसांनी शोध घेत टेम्पोचालक सुरेश पंढरीनाथ पवार (रा. कासारवाडी, पुणे) यास अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलिस नाईक संपत खबाले, नाथ जगताप यांनी केला.

SCROLL FOR NEXT