पुणे

पुणे : धावत्या गाडीवर कोसळले झाड

अमृता चौगुले

येरवडा : पुढारी वृत्तसेवा: विमाननगर येथे कैलास सुपर मार्केट चौक, बस थांबाजवळ अचानक चालत्या गाडीवर मोठे झाड कोसळले. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. यात जीवितहानी झाली नसली, तरी चारचाकी गाडीच बरेच नुकसान झाले आहे. झाड पडल्यामुळे रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. उद्यान विभाग आणि अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी सर्वांच्या मदतीने झाड कापून बाजूला करण्यात आले.

तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नाने हे झाड बाजूला करून रहदारी सुरळीत करण्यात आली. तोपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या वेळी माजी नगरसेवक राहुल भंडारे, संजय गवळी , दत्ता निकाळजे, चेतन तरहल यांनी विशेष मेहनत घेतली. उद्यान विभागाच्या मदतीने धोकादायक झाडांचे ऑडिट करून झाडे बाजूला करण्याचे काम करणार असल्याची माहिती भंडारे यांनी दिली.

SCROLL FOR NEXT