पुणे : गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात मध्यवस्तीत येतात. तसेच, गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक मिरवणूक पाहण्यासाठी येतात. त्यामुळे नागरिकांना पार्किंगसाठी सोय व्हावी म्हणून महापालिका शाळा, खासगी शाळा, सार्वजनिक पार्किंगबाबतची ठिकाणांची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. तेथे नागरिकांना आपली वाहने पार्क करण्याची सोय होणार आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी पार्किंगची सोय
गरवारे कॉलेज, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, काँग्रेस भवन, मनपा भवन पार्किंग, सीओईपी मैदान, मंगला टॉकीज, हमालवाडा पार्किंग, जयंतराव टिळक पूल ते भिडे पूल, नदीपात्राचा रस्ता, आयएलएस लॉ कॉलेज, संजीवनी हॉस्पिटल, जैन हॉस्टेल, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस, फुर्ग्युसन, आपटे प्रशाला, बीएमसीसी कॉलेज, पुरम चौक ते हॉटेल विश्व रस्त्याच्या डाव्या बाजूस, न्यू इंग्लिश स्कूल
चार ते आठ सप्टेंबरसाठी पार्किंगची ठिकाणे
बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन जिमखाना वाहनतळ, मिलेनियम प्लाझा वाहनतळ, लँडमार्क वाहनतळ शिरोळे रस्ता, प्रो. मे. यश एंटरप्रायजेस, सर्कस मैदान, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, टिळक पूल ते भिडे पूल नदीकिनारी, बालभवन समोर, सारसबाग रस्ता ते बजाब पुतळा ते सणस पुतळा चौक उजवी बाजू, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस चौक, हमालवाडा पार्किंग, गोगटे प्रशाला, एस. पी. कॉलेज, मंगला टॉकीज, काँग्रेस भवन, मनपा भवन पार्किंग, सीईओपी मैदान, पुरम चौक ते हॉटेल विश्व, देसाई कॉलेज.