पुणे

पुणे : दुचाकीचा अपघात; एक ठार, एक जखमी

अमृता चौगुले

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : नाणेघाटातून (ता. जुन्नर) परतताना वेगात असलेल्या दुचाकीचा फांगुळगव्हाण गावाजवळील वळणावर ताबा सुटून अपघात झाल्याची घटना सोमवारी (दि. 27) रात्री घडली. या अपघातात सचिन बाळू वाजे याचा मृत्यू झाला. प्रवीण बबन शिंगाडे (दोघेही रा. कळंबई, ता. आंबेगाव) हा जबर जखमी झाला.

याबाबतची फिर्याद प्रकाश देवराम केंगले (रा. जांभोरी, ता. आंबेगाव) याने जुन्नर पोलिसांकडे दिली आहे. दरम्यान, यावेळी वळणावरील उतारावर दुचाकीचा ताबा सुटल्यावर दुचाकी खड्ड्यात कोसळली. त्यानंतर काही वेळाने शुद्धीवर आल्यावर तेथून जाणार्‍या ग्रामस्थांनी जुन्नर पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून जखमींना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT