पुणे

पुणे : दुचाकी चोरणार्‍या चौघांना अटक

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा : वडगाव निंबाळकर पोलिसांनी मोटारसायकल चोरीप्रकरणी चौघांना अटक केली. त्यांच्याकडून सव्वातीन लाख रुपयांच्या चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

करंजेपूल गावच्या हद्दीतून दोन मोटारसायकली चोरी झाल्याचा गुन्हा वडगाव पोलिस ठाण्यात दाखल होता. त्यानुषंगाने चौकशी करीत असताना पोलिसांनी सुरज सुनील घमंडे (रा. सावंतवस्ती, वाघळवाडी, ता. बारामती) याच्यासह एका अल्पवयीनला ताब्यात घेतले होते. त्याने अभिजित दीपक राऊत (रा. आझादपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा), किशोर हनुमंत माने (रा. तडवळे, ता. कोरेगाव, जि. सातारा), शिवराज संतोष फाळके (पॉवर हाऊस, सातारा रोड, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांना त्या विकल्याचे सांगितले.

चौघांनाही अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख 90 हजार रुपयांची बुलेट व 1 लाख 25 हजार रुपयांची एक पल्सर दुचाकी जप्त केली. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे व सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

SCROLL FOR NEXT