पुणे

पुणे : तोतया पोलिसाकडून मोबाईलची चोरी

अमृता चौगुले

पुणे : पोलिस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल हिसकावून नेला. कात्रज-कोंढवा रस्त्यावर ही घटना घडली. तरुणाकडील मोबाईल हिसकावल्यानंतर चोरटे कारमधून पसार झाले. याबाबत संदीप म्हस्के (वय 22, रा. सासवड, ता. पुरंदर) याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संदीप कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एकता चौकात थांबला होता. त्या वेळी कारमधून आलेल्या चोरट्यांनी त्याला अडवले. कोठे निघाला आहे, अशी विचारणा करून त्याला धमकावण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी पोलिस असल्याची बतावणी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्याला मारहाण करून दहा हजारांचा मोबाईल हिसकावून नेला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT