पुणे

पुणे : तीन दिवसांत 67 जण ‘स्वाइन फ्लू’ बाधित; एका रुग्णाचा मृत्यू

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: स्वाइन फ्लू रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, गेल्या तीन दिवसांत 166 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील 92 रुग्णांच्या घशातील नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

त्यामध्ये 67 रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निदान झाले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी स्वाइन फ्लूच्या संसर्गाचा वेग वाढत असल्याचे आढळून आले आहे. गुरुवारी एका पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या शहरात सर्वत्र सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा, अंगदुखी अशी लक्षणे नागरिकांमध्ये आढळत आहेत.

SCROLL FOR NEXT