पुणे

पुणे : डाळिंब, लिंबू महागले; फळबाजारात कलिंगड, पपईचे दरही वाढले

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे मार्केट यार्डातील फळबाजारात डाळिंब, लिंबू, कलिंगड आणि पपईला मागणी वाढली असल्याने भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे तर मोसंबी, चिकू आणि पेरूची आवक वाढल्याने भावात घट झाली आहे़ अननस, संत्रा, खरबूज, सीताफळ आणि सफरचंदांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापार्‍यानी दिली़

लिंबू एक ते दीड हजार गोणी, डाळिंब सुमारे 30 ते 35 टन, पपई 10 ते 12 टेम्पो, कलिंगड 2 ते 3 टेम्पो, खरबूज सुमारे 2 ते 3 टेम्पो, पेरू 400 क्रेट, अननस 4 ट्रक, मोसंबी 60 ते 70 टन, संत्रा दोन टन, सीताफळ 8 ते 10 टन, चिकू 300 बॉक्स, सफरचंद 7 ते 8 हजार बॉक्स इतकी आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 500-700, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 30-140, गणेश : 5-30, आरक्ता 10-50. कलिंगड : 8-14, खरबूज : 10-18, पपई : 20-35, अननस (एक डझन) 70-270, पेरू (20 किलो) 200-40, मोसंबी (तीन डझन) 80-220, (चार डझन) 25-100, संत्रा (दहा किलो) 300-900, सीताफळ (एक किलो) 20-150, सफरचंद शिमला (25-30 किलो) 1800-3000, चिकू (10 किलो) 100-500.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT