पुणे

पुणे : टेरिफ कार्डचा वापर केल्यास कारवाई

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नुकत्याच लागू झालेल्या रिक्षा भाडेवाढीकरिता रिक्षाचालकांनी टेरिफ कार्डचा वापर केल्यास आरटीओकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. भाडेवाढ लागू करण्यासाठी रिक्षा मीटरचे रि-कॅलिब्रेशन करणे आवश्यक आहे. परंतु, काही रिक्षाचालक टेरिफ कार्डचा वापर करून भाडेवाढ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरटीओकडून रिक्षाचालकांनी टेरिफ कार्डचा वापर करू नये, असे सांगण्यात आले आहे. रिक्षाचालक टेरिफ कार्ड दाखवून रिक्षा भाडे वसूल करताना आढळल्यास आरटीओकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

मीटर रि-कॅलिब्रेशन येथे…
1) अलंकार पोलिस स्टेशनसमोर, कर्वेनगर
2) फुलेनगर, आळंदी रस्ता चाचणी मैदान
3) रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, इगलबर्ग कंपनी, लेन नं. 3
4) दिवे (पासिंग वाहने)
5) इऑन आयटी पार्कजवळ, खराडी पोलिस चौकीसमोर, खराडी

या मुदतीत करा रिक्षा मीटर रि-कॅलिब्रेशन
प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे कार्यक्षेत्रातील रिक्षाचालकांना भाडे दरवाढ दि. 1 सप्टेंबर 2022 पासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षाचे मीटर पुन: प्रमाणीकरणासाठी रिक्षाचालकांना दिनांक 1 सप्टेंबरपासून 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत सकाळी 7 ते दुपारी 4 दरम्यान रिक्षाचालकांनी रिक्षाचे मीटर रि-कॅलिब्रेशन करून घ्यावे, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT