पुणे

पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून एकावर हल्ला

अमृता चौगुले

खेड शिवापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवापूर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर रविवारी (दि. 17) रात्री साडेअकराच्या सुमारास जुन्या भांडणातून सहा जणांनी एकावर कोयत्याने वार केले.

ओम संजय जाधव (वय 19, रा. शिवापूर, नवकार पार्क, ई-विंग, ता. हवेली) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी ऋषिकेश भालेराव, विनायक ऊर्फ दाद्या थोरात, सिद्धार्थ ऊर्फ बाबू येनपुरे, जीवन आव्हाळ यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेण्यात आले आहे.  यश ऊर्फ नागेश नागटिळक हा फरार झाला आहे.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शिवापूर ग्रामपंचायतीसमोर जुन्या भांडणाचा राग मनात धरून वरील सहा जणांनी ओम जाधव यास कोयता, चॉपर व लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये जाधव जखमी झाला असून, त्यास कोंढणपूर फाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, राजगड पोलिसांना याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, उपनिरीक्षक निखिल मगदूम, हवालदार राहुल कोल्हे, प्रमिला निकम, संतोष तोडकर, पोलिस नाईक सोमनाथ जाधव यांनी कासुर्डी मार्गे मरीआई घाटातून पळून जाणार्‍या आरोपींपैकी पाच जणांना अटक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT