पुणे

पुणे : जुन्नरची गॅस शवदाहिनी वापराविना पडून

अमृता चौगुले

जुन्नर, पुढारी वृत्तसेवा : जुन्नर शहरातील भास्करघाट स्मशानभूमीत जुन्नर नगरपालिकेने 85 लक्ष रुपयांच्या विशेष निधीतून मार्च महिनाअखेर गॅस शवदाहिनी उभारली होती. मात्र, त्यानंतर केवळ 3 जणांनीच तिचा वापर केला असून, बहुतांश काळ वापराविना बंदच आहे.

मार्चअखेरपासून शहरात जवळपास 60 मृत्यूंची नोंद झाली आहे. मात्र, यापैकी केवळ 3 जणांनी गॅसदाहिनीचा पर्याय निवडल्याची नोंद आहे. यंत्रणा बंद असल्याची अनेक नागरिकांची तक्रार आहे. माजी नगरसेवक मधुकर काजळे यांनी ही यंत्रणा दोषयुक्त असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे या शवदाहिनीकडे जाणार्‍या मार्गावर चिखलाचे साम—ाज्य पसरले आहे. जोरदार पावसामुळे लगतच्या टेकडीवरील माती वाहून आल्याने शवदाहिनी असलेल्या इमारतीकडे जाणे नागरिकांना अशक्य होत आहे.

सदर यंत्रणा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. टेकडीवरील माती रोखण्यासाठी या ठिकाणी संरक्षक भिंत लवकरच उभारणार आहे.

                                                   – विवेक देशमुख, पालिका बांधकाम विभागप्रमुख

SCROLL FOR NEXT