पुणे : पुढारी वृत्तसेवा: जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात मोईन काळू शेख याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी जामीन मंजूर केला आहे. आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपीलाही जामीन मंजूर झाला आहे.
शेख हा मागील दोन वर्षांपासून तुरुंगात आहे. त्याने अॅड. महेश तुपे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. विविध अटी-शर्तींवर 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.