पुणे

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर होतोय कमी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी होताना दिसत आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 2000 पेक्षाही कमी झाली आहे. त्यामुळे सध्या काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, गणेशोत्सवात गर्दी वाढत असल्याने रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गर्दीत आरोग्यविषयक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी सक्रिय रुग्णांची संख्या 1810 इतकी होती. त्या दिवशी जिल्ह्यात 248 कोरोनाबाधितांचे निदान झाले होते. गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1731 असून, एका दिवसात 193 कोरोनाबाधितांचे निदान झाले.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात असल्याचे निदर्शनास आले होते. आता मुंबई (2540), ठाणे (1754) आणि पुणे (1731) हे सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या असलेले जिल्हे आहेत. राज्यात 7 हजार 701 सक्रिय रुग्ण आहेत. 7 सप्टेंबर रोजी राज्यात 869 नव्या कोरोनाबाधितांचे निदान झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08 टक्के इतके असून, मृत्यूदर 1.82 टक्के नोंदवला गेला आहे.

कोरोनाच्या महामारीनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नागरिक गणेशोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. कोरोना कमी झालेला असला, तरी पूर्णपणे ओसरलेला नाही. त्यामुळे गणेशोत्सवात आणि विसर्जन मिरवणुकीत गर्दीत वावरताना मास्क वापरण्याचे आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

गणेशोत्सवात घ्या काळजी : सक्रिय रुग्णसंख्या 1731

काय घ्याल काळजी ?
गर्दीत जाताना मास्क आवर्जून वापरा
बुस्टर डोस घेण्यास विलंब करू नका
सहव्याधी असलेले रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुळे यांची विशेष काळजी घ्या.
सण-समारंभात सुरक्षेचे नियम पाळा

जिल्ह्यातील कोरोना स्थिती
तारीख दैनंदिन रुग्णसंख्या
31 ऑगस्ट 283 1810
1 सप्टेंबर 133 1775
2 सप्टेंबर 371 1675
3 सप्टेंबर 305 1681
4 सप्टेंबर 296 1735
5 सप्टेंबर 79 1757
6 सप्टेंबर 193 1731

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT