पुणे

पुणे : गॅरेजमधील 25 हजारांची रक्कम चोरली

अमृता चौगुले

बारामती, पुढारी वृत्तसेवा : दुरुस्तीसाठी मोटार गॅरेजमध्ये घेऊन आलेल्या चालकाने गॅरेजमालकाची ड्रॉवरमध्ये ठेवलेली सुमारे 25 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ओंकार बॅटरी व गॅरेजमध्ये ही घटना घडली.शहर पोलिसांनी एमएच 25 झेड 8686 या मोटारीच्या चालकावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

गॅरेजमालक आशिष जालिंदर मुरुमकर (रा. मोतीबाग, इंदापूर रोड, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. 23) सकाळी साडेअकराच्या सुमारास संबंधित मोटार त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी आली होती. या वेळी फिर्यादीचा भाऊ आकाशने घरातून 25 हजार रुपयांची रक्कम आणत ती गॅरेजच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. संबंधित मोटारीचे काम फिर्यादीने केले. त्यानंतर दुपारी मोटारचालकाने गॅरेजमधून मोटार नेली.

दरम्यान, दुपारी दीडच्या सुमारास फिर्यादीने काउंटरच्या गल्ल्यात पाहिले असता रक्कम सापडली नाही. त्यांनी कामगारांना विचारणा केली. परंतु, कोणीही ही रक्कम घेतली नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी गॅरेजमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले असता त्यात संबंधित मोटारीच्या चालकाने मोटारदुरुस्तीचे काम सुरू असताना ड्रॉवरमधील रक्कम काढल्याचे दिसून आले. त्यानुसार फिर्याद दिली.

SCROLL FOR NEXT