पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्य शासनाने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अर्ज मागवले आहेत. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांना येत्या 7 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली आहे. अर्ज करू इच्छिणार्या शिक्षकांनी 28 जुलै ते 07 ऑगस्ट दरम्यान अर्ज करणे
गरजेचे आहे.
अर्ज करण्यासाठी लिंक
https://docs.google.com/forms/d/e/1F-IpQLSfn Hr3svcX256Ky2qc Gi8R4 EY XWWVrLvF7E4F44 8Gwvw90/viewform?pli=1
पुरस्काराचे वेळापत्रक…
ऑनलाईन नोंदणी – 28 जुलै ते 7 ऑगस्ट
संचालनालयीन स्तरावरील काम – 8 ऑगस्ट
जिल्हास्तरावरून प्रत्यक्ष शाळा भेट – 10 ते 11 ऑगस्ट
जिल्हास्तरावरील मुलाखत – 12 ते 13 ऑगस्ट
राज्यस्तरावरील मुलाखत – 16 ते 20 ऑगस्ट
राज्य शिक्षक पुरस्कार संबंधित संचालनालय स्तरावरील काम पूर्ण करणे – 22 ऑगस्ट
शासनास अंतिम यादी सादर करणे – 24 ऑगस्ट.