पुणे : मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक वाढली असून कोथिंबीर, कांदापात, चाकवत, पुदिना आणि पालकच्या भावात घट झाली असून, पुदिन्याच्या भावात मात्र वाढ झाली आहे; तर मेथी, शेपू, अंबाडी, मुळे, राजगिरा, चुका आणि चवळईचे भाव मात्र स्थिर असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली.
रविवारी मार्केट यार्डात कोथिंबीर दीड लाख आणि मेथीची 50 हजार जुड्यांची आवक झाली आहे़ घाऊक बाजारात जुडीमागे कोथिंबिरीच्या भावात तब्बल 10 रुपयांनी घट झाली आहे़ कांदापात तीन रुपये, चाकवत, पुदिना आणि पालकच्या भावात प्रत्येकी दोन रुपयांनी घट झाली आहे. करडईच्या भावात जुडीमागे एक रुपयाने वाढ झाली आहे.