केडगाव, पुढारी वृत्तसेवा : केडगाव-चौफुला रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोक्याचा झाला आहे. त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.
हा रस्ता नगरकडून सातारामार्गे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. यामुळे नगर, जालना, नाशिक, मनमाड आदी भागातील वाहनांची या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. परंतु, हा रस्ता सध्या अनेक ठिकाणी खड्डे पडून उखडला आहे. सध्या पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचत आहे. परिणामी वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने छोटे अपघातही होत आहे.
गेल्या दिवसांत झालेल्या अपघातांत काही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. हा रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. या रस्त्याची तातडीले दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.