पुणे

पुणे : कॅम्पमधील रस्त्यावर मोकाट जनावरांचे ठाण

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तेसवा: पुणे कँटोन्मेंटच्या हद्दीतील प्रमुख रस्त्यावर मोकाट जनावरे सोडली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम होत असून, पुणे कँटोन्मेंट बोर्डाकडून कोंडवड्याचा उपयोग केला जात नाही. या मोकाट जनावरांकडे बोर्ड प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. पुणे कँटोन्मेंटच्या हद्दीतील सोलापूर रस्ता, कुंभार बावडी, छत्रपती शिवाजी मार्केट, बाबाजान दर्गा चौक, खान्या मारुती चौक, पुलगेट बसस्थानक, मोदीखाना, अरोरा टॉवर परिसरातील रस्त्यावर मोकाट जनावरे असतात.

मोकाट जनावरे ताब्यात घेऊन बांधण्यासाठी कोंडवडा आहे. मात्र, त्याठिकाणी जनावरे बांधली जात नाहीत. मोकाट जनावरांकडे कँटोन्मेंट प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर रोड डेक्कन टॉवर परिसरात मोकाट जनावरे मुख्य रस्त्यावर असतात. या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मनसेचे शिरीष आगुरेड्डी यांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT