पुणे

पुणे : आरटीई प्रवेशाच्या चौथ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्यापही 23 हजार 388 जागा रिक्तच आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता विद्यार्थ्यांचे प्रवेश 27 जुलैपर्यंत निश्चित करता येणार आहेत. आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहेत. यंदा राज्यातील 9 हजार 86 शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या 1 लाख 1 हजार 906 जागांसाठी 2 लाख 82 हजार 783 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले.

त्यातील नियमित आणि प्रतीक्षा यादी मिळून 1 लाख 23 हजार 951 विद्यार्थ्यांना सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झाला. सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अद्यापही 23 हजार 388 जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती प्राथमिकचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.

SCROLL FOR NEXT