पुणे

पुणे : आठ लाख हेक्टरवरील पिके बाधित; जुलैचा राज्यातील प्राथमिक अंदाज अहवाल

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पहिल्या पंधरवड्यात सर्वदूर झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे खरीप हंगामातील पिकांच्या बाधित क्षेत्राचा आकडा 24 जिल्ह्यांत मिळून सुमारे 8 लाख हेक्टरवर पोहोचला आहे. तसेच जमीन खरडून गेलेले क्षेत्र 3 हजार 793 हेक्टरइतके असल्याचे कृषी आयुक्तालयातील अधिकार्‍यांनी सांगितले. जिल्हानिहाय पिके बाधित झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे आहे.

ठाणे 21, रायगड 105, रत्नागिरी 3, नाशिक 2 हजार 81, धुळे 2 हजार 180, नंदुरबार 191, जळगाव 34, पुणे 2 हजार 529, अहमदनगर 2, सांगली 2, हिंगोली 15 हजार 944, लातूर 15, नांदेड 2 लाख 97 हजार 432, अकोला 72 हजार 37, अमरावती 27 हजार 170, बुलडाणा 6 हजार 992, वाशिम 7, यवतमाळ 1 लाख 22 हजार 113, वर्धा 1 लाख 31 हजार 236, गोंदिया 156, नागपूर 28 हजार 752, भंडारा 18 हजार 723, गडचिरोली 12 हजार 661, चंद्रपूर 55 हजार 912 हेक्टर मिळून 7 लाख 96 हजार 298 हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

भात, सोयाबीन, कापूस, मका, मूग, उडीद, तूर, केळी, भाजीपाला, हळद, ज्वारी, फळपिके बाधित झाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. जुलै महिन्यातील अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे शेती व फळपिकांचे बाधित क्षेत्राचा 20 जुलैअखेरचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल कृषी विभागाकडून तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये विस्तृत माहिती तयार करून मंत्रालय स्तरावर पाठविण्यात आला आहे. तसेच महसूल विभागाकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे सांगण्यात आले.

SCROLL FOR NEXT