पुणे

पुणे : अन् राष्ट्रगीत गायनासाठी वधू देखील थांबली!

अमृता चौगुले

मांडवगण फराटा, पुढारी वृत्तसेवा : बोहल्यावर चढण्यापूर्वी राष्ट्रगीत गायनासाठी सादलगाव (ता.शिरूर) येथे वधूसुद्धा दहा मिनिटे थांबली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवाचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण राज्यभर राष्ट्रगीत सामूहिक गायनाचे आवाहन करण्यात आले होते.

दरम्यान, सादलगाव (ता. शिरूर) येथील वावगे कुटुंबातील वधू गौरी व दापोडी येथील जालिंदर खळदकर यांचे सुपुत्र आकाश यांचा विवाह बुधवारी (दि.१७) पार पडणार होता. यावेळी वधू घरातून निघत असताना शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रगीत गायनासाठी थांबली व त्यानंतरच वधू पुढील कार्यासाठी मार्गस्थ झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT