पुणे

पुणे : अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतूकीत बदल

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सोमवारी (दि. 1) साजर्‍या होणार्‍या जयंतीनिमित्त सारसबाग, स्वारगेट परिसरातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. शहरातील विविध ठिकाणची स्थानिक मंडळे व राजकीय पक्ष कार्यकर्ते सारसबाग येथील पुतळ्याला मिरवणुकीने येऊन पुष्पहार अर्पण करीत असतात. त्यामुळे नागरिकांची व वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून तेथील गर्दी कमी होईपर्यंतच्या कालावधीत हा वाहतूक बदल असणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने अग्निशमन दल, पोलिस व रुग्णवाहिका यांना सूट देण्यात आली आहे.

असा आहे वाहतूक व्यवस्थेत बदल
जेधे चौकातून सारसबागकडे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यावेळी वाहनचालकांनी जेधे चौकातून सिंहगड रोडला जाण्यासाठी होल्गा चौकातून, मित्रमंडळ चौक, सावरकर चौक मार्गे सिंहगड रोडला जावे. जेधे चौकातील वायजंक्शनवरून सारसबागेकडे जाणार्‍या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कात्रजकडून सारसबागेकडे जाणार्‍या वाहनचालकांनी ब्रिजवरून न जाता लक्ष्मीनारायण (होल्गा चौक) चौकातून डावीकडे वळून जावे.

वेगासेंटर ते सारसबागपर्यंत ग्रेडसेपरेटरमधून वाहनचालकांना जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वेगासेंटरपासून घोरपडी पेठ उद्यान, राष्ट्रभूषण चौकपासून हिराबाग चौकाकडून पुढे जावे. पुरम चौक ते जेधे चौक या रस्त्यावरील एकेरी मार्गात वाहनांना आवश्यकतेनुसार दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत शिथिलता देऊन दुहेरी प्रवेश देण्यात येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT