पुणे

पुणे : 25 प्रभागांत फेरबदल; राजकीय गणिते बिघडलीही अन् सुधारलीही

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आगामी महापालिका निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण सोडतीमुळे तब्बल पंचवीस प्रभागांमधील आरक्षणात फेरबदल झाले आहेत. त्यामुळे या सर्व प्रभागातील राजकीय समीकरणे आता पुन्हा बदलली आहेत. त्यामुळे एससी व एसटी प्रवर्गाच्या आरक्षण सोडतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर महापालिकेत नगरसेवक म्हणून जाण्याचे स्वप्न पाहणार्‍या अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

बदल झालेले प्रभाग
प्रभाग क्र. 3 – लोहगाव- विमाननगर या प्रभागात यापूर्वी खुल्या गटासाठी एक जागा आरक्षित होती. मात्र, ही खुली जागा महिलांसाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे आता या प्रभागात खुल्या वर्गासाठी जागाच राहिली नाही.
प्रभाग क्र. 5- पश्चिम खराडी- वडगाव शेरी या प्रभागामध्ये दोन जागा खुल्या गटासाठी होत्या. त्यापैकी एक जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाली असून सर्वसाधारणसाठी एकच जागा उरली आहे.

प्रभाग क्र. 6- वडगावशेरी- रामवाडी या प्रभागामध्ये देखील दोन जागा खुल्या गटासाठी होत्या. त्यापैकी एक जागा ओबीर्सीसाठी आरक्षित झाली.
प्रभाग क्र. 15- गोखलेनगर- वडारवाडी या प्रभागातील दोन जागा खुल्या गटासाठी होत्या. त्यापैकी एक ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाली.
प्रभाग क्र. 16- फर्ग्युसन कॉलेज- एरंडवणे या प्रभागामध्ये पूर्वी दोन जागा खुल्या गटासाठी आरक्षित होत्या, तर एक जागा खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षित होती. आता मात्र, दोन जागा महिलांसाठी असून त्यामधील एक ओबीसी महिलेसाठी आरक्षित असून खुल्यासाठीची एकच जागा आहे.

प्रभाग क्र. – 18 – शनिवारवाडा- कसबा पेठ प्रभागातील दोन जागा खुल्या गटासाठी होत्या. आता मात्र दोन जागा महिलांसाठी झाल्या असून, त्यापैकी एक जागा ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाली आहे.
प्रभाग क्र. 21 – कोरेगाव पार्क- मुंढवा प्रभागामध्ये खुल्या प्रवर्गासाठीच्या जागेवर खुल्या गटातील महिला आरक्षण पडले आहे, तर ओबीसी प्रवर्गाची जागा खुली झाली आहे. इथेही खुल्या गटासाठी एकही जागा नाही.

प्रभाग क्र. 23- साडेसतरानळी- आकाशवाणी प्रभागामध्ये पूर्वी दोन जागा महिलांसाठी आरक्षित होत्या. तेथील महिलांसाठीची एक जागा कमी झाली असून, त्या जागेवर ओबीसी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण
पडले आहे.
प्रभाग क्र. 24- मगरपट्टा- साधना विद्यालय प्रभागामध्ये दोन जागा महिलांसाठी आरक्षित होत्या. नवीन रचनेत एकच जागा महिलांसाठी आरक्षित झाली असून उर्वरित जागा ओबीसी आणि खुल्या गटासाठी राहिल्या आहेत.
प्रभाग क्र. 28- महात्मा फुले स्मारक- भवानी पेठ प्रभागामध्ये एक जागा महिलांसाठी तर दोन जागा खुल्या गटासाठी राखीव होत्या. खुल्या गटाची एक जागा कमी झाली असून ओबीसी महिलांसाठी राखीव झाली आहे.

प्रभाग क्र. 29- घोरपडे पेठ उद्यान- महात्मा फुले मंडई या प्रभागामधील दोन खुल्या प्रवर्गातील जागेपैकी एक जागा ओबीसी प्रवर्गातील खुल्या गटासाठी राखीव झाली आहे.
प्रभाग क्र. 30- जय भवानीनगर- केळेवाडी प्रभागातील दोन खुल्या प्रवर्गातील जागांपैकी एका जागेवर ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे.
प्रभाग क्र.- 31- कोथरूड गावठाण- शिवतीर्थनगर प्रभागामध्ये पूर्वी दोन जागा खुल्या गटासाठी राखीव होत्या. त्याठिकाणी आता दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. यापैकी एक जागा ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाली आहे.

प्रभाग क्र. 32- भुसारी कॉलनी- बावधन खुर्द या प्रभागामध्ये पूर्वी दोन जागा महिलांसाठी राखीव होत्या, त्यापैकी एक जागा कमी झाली असून त्या जागेवर ओबीसी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे.
प्रभाग क्र. 33- आयडीयल कॉलनी- महात्मा सोसायटी प्रभागामध्ये दोन जागा खुल्या गटासाठी राखीव होत्या. त्यापैकी एका जागेवर ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण पडले आहे.
प्रभाग क्र. 34- वारजे- कोंढवे धावडे या प्रभागामध्ये दोन जागा खुल्या गटासाठी होत्या. त्यापैकी एक जागा कमी झाली असून त्या जागेवर ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण पडले आहे.

प्रभाग क्र. 35- रामनगर – उत्तमनगर शिवणे या प्रभागामध्ये दोन जागा महिलांसाठी राखीव होत्या. त्यापैकी एक जागा कमी झाली असून त्या जागेवर ओबीसी प्रवर्गातील खुल्या गटासाठी आरक्षण पडले आहे.
प्रभाग क्र. 37- जनता वसाहत- दत्तवाडी या प्रभागामध्ये खुल्या गटासाठी एक, एस.सी. खुल्या गटासाठी एक आणि एक जागा महिलांसाठी राखीव होती. आजच्या सोडतीमध्ये यापैकी खुल्या गटासाठीची जागा ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे.

प्रभाग क्र. 44- काळेबोराटे नगर- ससाणेनगर प्रभागामध्ये दोन जागा खुल्या गटासाठी होत्या. त्यापैकी एक जागा कमी झाली असून त्या जागेवर ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण पडले आहे.
प्रभाग क्र. 45 – फुरसुंगी प्रभागामध्ये दोन जागा खुल्या गटासाठी होत्या. त्यापैकी एक जागा कमी झाली असून त्या जागेवर ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण पडले आहे.
प्रभाग क्र. 48- अप्पर सुपर इंदिरानगर प्रभागातील एका एस.सी. जागेसह दोन जागा महिलांसाठी आरक्षित होत्या. नवीन आरक्षणात त्यापैकी खुल्या गटातील महिलांची जागा कमी झाली असून त्या जागेवर ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण पडले आहे.

प्रभाग क्र- 49- बालाजीनगर- शंकर महाराज मठ प्रभागामध्ये पूर्वी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या होत्या. त्यापैकी एक जागा कमी झाली असून त्याठिकाणी ओबीसी प्रवर्गातील खुल्या गटाचे आरक्षण पडले आहे.
प्रभाग क्र. 56- चैतन्यनगर- भारती विद्यापीठ प्रभागामध्ये दोन जागा महिलांसाठी राखीव होत्या. त्यापैकी एक जागा कमी झाली असून त्या जागेवर ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण पडले आहे.

प्रभाग क्र. 57 – सुखसागरनगर- राजीव गांधीनगर प्रभागामध्ये दोन जागा महिलांसाठी आरक्षित होत्या. त्यापैकी एक जागा कमी झाली असून त्याठिकाणी ओबीसी प्रवर्गातील खुले आरक्षण पडले आहे.
प्रभाग क्र. 58- कात्रज- गोकुळनगर प्रभागामध्ये दोन जागा खुल्या गटासाठी आरक्षित होत्या. त्यापैकी एक जागा कमी झाली असून ती जागा ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाली आहे.

SCROLL FOR NEXT