पुणे

पिस्तूल बाळगल्याने तडीपार गुंडास अटक

अमृता चौगुले

पिंपरी : अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी शस्त्रविरोधी पथकाने एका तडीपार गुंडाला अटक केली आहे. गुरुवारी (दि. 30) गवतेवस्ती, चाकण येथे ही कारवाई करण्यात आली. माधव रोहिदास गिते (25, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळ रा. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिस शिपाई प्रवीण मुळूक यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपी माधव गीते याला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. मात्र, तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो जिल्ह्याच्या हद्दीत आला होता. तसेच, आरोपी सोबत गावठी पिस्तुल बाळगत होता. याबाबत शस्त्र विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT