पुणे

पिसोळीत टोळक्यांचा धुडगूस; भरदिवसा हातात कोयते नाचवत वाहनांची तोडफोड

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पिसोळीत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लोखंडी कोयता, दगड-विटांनी भरदिवसा रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या पाच वाहनांची तोडफोड केली. तोडफोड करण्यात आलेल्या वाहनांत दोन चारचाकी, दुचाकी, टेम्पो, पिकअप अशी प्रत्येकी एक वाहनांचा समावेश आहे. या प्रकरणी दीपक धावडे (वय 40, रा. पिसोळी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी टोळक्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास सुदामा भेळसमोर जगदंबा भवन मार्ग पिसोळी येथे घडली आहे.

दहशत निर्माण करण्याच्या हेतूने पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हातात लोखंडी कोयता, दगड-विटा घेऊन रस्त्याच्या कडेला उभा केलेल्या वाहनांची तोडफोड केली. हा प्रकार घडल्यानंतर धावडे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. गेल्या काही दिवसांपासून शहरात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने टोळक्याकडून वाहनांची तोडफोड केली जाते आहे. त्यामुळे टोळक्याचा बंदोबस्त करण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे राहिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT