पुणे

पिंपळे गुरव : मैलामिश्रित पाण्यामुळे नदी प्रदूषित

अमृता चौगुले

पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : येथील स्मशानघाट भागात ड्रेनेजलाईन चोकअप झाल्याने मैलामिश्रित पाणी बर्‍याच दिवसांपासून थेट पवना नदीत सोडले जात आहे. त्यामुळे नदी प्रदुषणात दिवसेंदिवस वाढ होत असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सांगवी, पिंपळे गुरव परिसरातून मुळा आणि पवना नदी वाहते. परंतु, नदी पात्रात थेट मैलामिश्रित पाणी मिसळत असल्याने नदी प्रदूषणात मोठ्या प्रमाणत वाढ होत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे.

याविषयी स्थानिकांनी अनेक वेळा महापालिकेच्या संबधित अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. परंतु, प्रशासनाने याची दखल घेतली नाही. पावसाळा सुरू असल्याने उन्हाळ्यात वाढलेली जलपर्णी वाहून नदीने मोकळे श्वास घेतला असला तरी ड्रेनेजलाईन लिक असल्यामुळे मैलामिश्रित पाणी नदीत मिसळत आहे. त्यामुळे प्रदुषणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नदीसुधार प्रकल्प राबविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे

SCROLL FOR NEXT