पुणे

पिंपळे गुरव : जिजामाता उद्यानासमोर पदपथालगत दारूच्या बाटल्या

अमृता चौगुले

पिंपळे गुरव : येथील जिजामाता उद्यानासमोर नागरिकांच्या सोयीकरिता पदपथ उभारण्यात आला आहे. परंतु, पदपथाच्या शेजारी लावलेल्या झाडांमध्ये दारुच्या बाटल्या टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पिंपळे गुरव परिसरात महापालिकेकडून पदपथ तयार करण्यात आले आहेत. तसेच, सुशोभीकरणासाठी झाडे लावण्यात आली आहेत.

पदपथाला लागूनच पालिकेची शाळादेखील आहे. पदपथालगत सुशोभित झाडांमध्ये आता दारूच्या बाटल्या खच पाहायला मिळत आहे. स्मार्ट सिटी सुशोभित करण्याकरिता पालिकेकडून पदपथाच्या मधोमध झाडी लावली आहे. परंतु, तळीरामांनी या भागात दारूचा अड्डा बनविला आहे. रात्रीच्या वेळी पदपथावर बसून टवाळखोर दारु पितात आणि बाटल्या झाडांमध्ये टाकत आहेत. त्यामुळे पदपथाची दुरवस्था होत असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील नागरिकांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

SCROLL FOR NEXT