पुणे

पिंपरीः चारचाकी चालकाची दुचाकीस्वारास मारहाण

अमृता चौगुले

पिंपरीः चारचाकीची दुचाकीस धडक का दिली, याचा जाब विचारणार्‍या दुचाकीस्वारास मारहाण केल्यामुळे चारचाकीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी 8 रोजी रात्री साडेसात वाजता आदर्शनगर, हिंजवडी येथे घडली. फिर्यादी उल्हासराव देशमुख (वय 50, रा. काकडे कॉलनी चिंचवड) यांचा दुधाचा व्यवसाय असून, ते आपल्या मुलासह दुधाचे बिल आणण्याकरीता रस्त्याने निघाले होते.

एमएच 14 जेएम 0652 क्रं. चा चारचाकीचा मालक आरोपी भगवान विठ्ठल साखरे (वय 41, रा. आदर्शनगर, हिंजवडी) यांची गाडी फिर्यादीच्या गाडीला धडकल्याने त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले व मुलाच्या पायालाही लागले. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादीस आरोपीने दगड डोक्यात मारल्याने गंभिर दुखापत झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT