पुणे

पिंपरी : हिंजवडीतील चिकन, मटण वेस्ट रावेतमध्ये

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : हिंजवडी आयटी व ग्रामपंचायत परिसरातील दुकानदार व विक्रेते रात्री उशिरा चिकन, मटण, मांस वेस्ट पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत परिसरातील जलउपसा केंद्र व नदीकाठावर आणून टाकतात. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरून दुर्गंधी पसरत आहे. संबंधित दुकानदार व विक्रेत्यांच्या विरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाने वाकड पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.28) गुन्हा नोंदविला आहे.

रावेत स्मशानभूमीतील रात्रपाळीतील कर्मचार्याने नदीजवळ एका वाहनातून चिकन, मटण वेस्ट आणून टाकला जात असल्याचे सोमवारी (दि.27) रात्री पाहिले. त्या वाहनाचे व्हिडिओ शूटींगही करण्यात आले. वाहनांचा व त्यांच्या मालकांचा शोध घेतला असता, हिंजवडी परिसरातील चिकन व मटण वेस्ट गोळा करून ते शहरात आणून टाकत जात असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शहरात कोणत्याही भागात कचरा टाकला जात असल्याचे आढळून आल्यास त्वरीत महापालिकेस कळवावे, असे आवाहन पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT