पिंपरी : फुकट रेशन मिळत असल्याचे सांगून हातचलाखीने महिलेचे 20 हजारांचे दागिने लंपास केले. ही घटना गुरुवारी (दि. 14) दुपारी आळंदी-भोसरी रोड, भोसरी येथे घडली. याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
आरोपींनी फिर्यादी यांना फुकट रेशन मिळत असल्याचे सांगितले. त्यानंतर रेशन घेण्यासाठी अंगावरील 20 हजार रुपये किमतीचे दागिने काढून एका पिशवीत ठेवायला भाग पाडले. त्यानुसार, महिलेने दागिने काढून ठेवले असता आरोपींनी हातचलाखीने पिशवी बदलून
पळ काढला.