पुणे

पिंपरी : सुभाषनगरला कमी दाबाने पाणीपुरवठा

अमृता चौगुले

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 'ग' क्षेत्रीय जनसंवाद सभेत सोमवारी (दि.11) प्रामुख्याने पिंपरी गाव व पिंपरी कॅम्पमधील नागरिकांनी आपापल्या भागातील समस्या मांडल्या. त्यात पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा नीट होत नसल्याच्या तक्रारींचा समावेश होता. प्रभाग क्रमांक 21 मधील सुभाष नगर, दुर्गा माता मंदिर भागात पाणीपुरवठा सुरळीत करा कैलास नगर भागात ड्रेनेजचे काम पूर्ण होऊनही डांबरीकरण झाले नाही, याकडे विजय ओव्हाळ यांनी लक्ष वेधले.

तर पिंपरी गावातील वाघेरे कॉलोनी कॉर्नर, शिवकृपा बिल्डिंग येथे तसेच जुना काटेपिंपळे रस्ता नर्सरीजवळील रस्त्यावर पावसाच्या पाण्याचा निचरा नीट होत नसल्याने पाणी साचून राहत असल्याचे अनिता वाळुंजकर यांनी सांगितले. कैलास सानप यांनी डीलक्स चौक ते काळेवाडी रस्त्या नगर पदपथावर टपर्‍या झाल्या असून त्या खाली कराव्यात तसेच बसथांबा पूर्वी होता तिथून काढून चुकीच्या ठिकाणी केला आहे, याकडे लक्ष वेधले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT