पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुनर्वापर करता न येणार्या (सिंगल यूज प्लास्टिक) प्लॅस्टिकवर 1 जुलैपासून राज्यात बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातही त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
कॅरिबॅग, विविध प्रकारच्या वस्तूंना येणारे पॅकिंग, प्लॅस्टिकचे कव्हर, चमचे, प्लॅस्टिकचे स्ट्रॉ, सर्व प्रकारच्या ग्लास, प्लेट, थर्माकोलच्या वस्तू अशा कोणत्याही प्रकारच्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर (सिंगल यूज) होत नाही, अशा वस्तू वापरता येणार नाही. सुरुवातीला 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती.
त्यानंतर 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांना बंदी घालण्यात आली. तर, आता नव्या निर्णयानुसार 'सिंगल यूज' प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी दिली.