पिंपरी : बुलेटच्या सायलेंसरमध्ये बदल केल्याप्रकरणी आरोपीवर मोटार वाहन कायदा कलम 198 व 279, 290 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (2 रोजी) घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उपेंद्रसिंग रामशब्द सिंग (वय 30 रा. मारूंजी, मुळशी) याने एमएच 14 ईव्ही 7199 क्रमांक असलेल्या बुलेटच्या सायलेंसरमध्ये बदल केला.
तसेच कर्णकर्कश आवाज करीत, वेडीवाकडी मोटार चालवित असल्याने चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.