पुणे

पिंपरी : सफाईच्या 220 कोटींच्या निविदेत भ्रष्टाचार

अमृता चौगुले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातील दैनंदिन रस्ते व गटर साफसफाईच्या 8 क्षेत्रीय कार्यालयनिहाय एकूण 220 कोटींच्या निविदा प्रक्रियेत आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप रयत विद्यार्थी परिषदेने केला आहे. त्या प्रकरणाची तक्रार अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडे करण्यात आली आहे.

निविदेच्या नियम अटी व शर्तींचे उल्लंघन करून नियमबाह्य पद्धतीने अपात्र कंत्राटदारास पात्र करून कंत्राट दिले. ठराविक कंत्राटदारास आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक इतर कंत्राटदारास अपात्र केले. शुभम उद्योग, तिरुपती इंडस्ट्रियल सर्व्हिसेस, सिक्युअर आयटी मॅनेजमेंट या कंत्राटदारास एकापेक्षा जास्त कंत्राट देण्यात आले.

अतिरिक्त परफॉर्मन्स रक्कम 8 दिवसात भरणे बंधनकारक असताना 25 दिवस उशिरा ती रक्कम घेण्यात आली. अनामत रक्कम भरण्याकरिता सवलत देण्यात आली. एक टक्के बायना रक्कम अनामत रक्कममध्ये वर्ग करून 1 टक्के अनामत रक्कम घेऊन करारनामा करण्यात आला. कामाचे आदेश देण्यात आले.

उर्वरित 3 टक्के अनामत रक्कम देय बिलातून 12 समान हप्त्यातून वसूल करण्याचे नियमबाह्य पद्धतीने तरतूद करण्यात आली. अटी व शर्ती कंत्राटदारांचे हित लक्षात घेऊनच तयार करण्यात आल्या. कंत्राटदारांनी दहा तारखेपर्यंत कामगारांचा पगार दिला नाही तर याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाईची तरतूद केली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT