पुणे

पिंपरी : संरक्षक जाळ्यांनी झाडांचा गुदमरला श्वास

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला, पण आणि वृक्षांना संरक्षण देण्यासाठी लोखंडी गोलाकार जाळ्या दहा वर्षांपूर्वी लावल्या आहेत. मात्र, याच जाळ्यांमुळे झाडांचा श्वास गुदमरत आहे. मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी उद्यान प्रभारी अधिक्षक गोरखनाथ गोसावी यांच्याकडे तीन महिन्यांत वारंवार निवेदने दिली आहेत.

मात्र, यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. पालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या पिढीची ऑक्सिजनची सोय म्हणून वृक्षारोपण केले. रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला पण आणि वृक्षांना संरक्षण देण्यासाठी लोखंडी गोलाकार जाळ्या दहा वर्षापूर्वी लावल्या आहेत.

आता ही झाडे खूप मोठी झाली आहेत आणि झाडाच्या बुंध्यामध्ये लोखंडी जाळ्या घुसलेल्या आहेत. काही ठिकाणी जाळ्या तुटलेल्या आहेत. आता मोठ्या झाडांना अशा संरक्षक जाळ्यांची आवश्यकता नाही. यामुळे झाडांची वाढ खुंटलेली आहे, झाडाच्या बुंध्याला इजा झाल्या आहेत. अशी काही झाडे फेमस चौकाच्या जवळ, गणपती मंदिराच्या समोर आहेत व इतर ठिकाणचे अशा प्रकारची झाडे पालिकेने शोधून मोठ्या गोलाकार जाळया काढाव्यात म्हणजे झाडाची वाढ होऊन झाडे मोकळा श्वास घेतील. येत्या पंधरा दिवसांत त्यांनी संरक्षक जाळ्या काढल्या नाहीत तर आम्ही सर्व कार्यकर्ते पुष्पगुच्छ उद्यानासमोर उपोषण करू, असा इशारा देण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT