पुणे

पिंपरी : शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकास अटक

अमृता चौगुले

पिंपरी : शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा रचून अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 25) दुपारी करण्यात आली. ऋषिकेश उर्फ मोन्या शामराव वाघेरे (रा. कस्पटेवस्ती, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिस हवालदार नामदेव वडेकर यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आरोपी परिसरात दहशत पसरवण्यासाठी सोबत पिस्तुल बाळगत असल्याची माहिती शस्त्र विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, गुरुवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास आरोपीच्या घरात छापा मारून कारवाई केली. त्यावेळी पोलिसांना आरोपीकडे 25 हजारांचे एक गावठी बनावटीचे पिस्तुल आणि 300 रुपयांचे एक जिवंत काडतूस जप्त मिळून आले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT