पुणे

पिंपरी : व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दारूची पार्टी करण्यासाठी खोलीची मागणी करीत दापोडीतील व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, प्रिंटिंग प्रेसमध्ये जाऊन तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि. 8) फुगेवाडी येथे सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
याप्रकरणी हेमंत लक्ष्मण फुगे (44, रा. फुगेवाडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी विशाल दिनकर (रा. फुगेवाडी) याच्यासह त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल याने फिर्यादी यांना फोन करून 'तुमच्या चाळीत नवीन होणार्‍या बांधकामात मला व माझ्या दोस्तांना दारुच्या पार्टीकरिता कायमची रुम दे, नाहीतर तुला मारून टाकीन, अशी धमकी देत शिवीगाळ केली. तसेच, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये तोडफोड करीत दीपक पवार यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या दुचाकीची लोखंडी पाईप आणि दांडक्याच्या साह्याने तोडफोड करीत दहशत पसरवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास भोसरी पोलिस करीत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT