पिंपरी : पती आणि दिराला मारून टाकण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना बालमल चाळ, पिंपरी येथे घडली. दीपूराज ऊर्फ जितू राधिलाल माहोर (19, रा. श्रमिकनगर, बालमल चाळ, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपीने फिर्यादी यांच्या घरी येऊन, 'तू मला आवडते. तू माझ्याशी लग्न कर. तू नाही म्हणाली तर तुझ्या नवर्याला आणि दिराला त्यांच्या कामावरच खल्लास करून टाकीन', अशी धमकी दिली. तसेच, महिलेसोबत गैरवर्तन करून विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.