पुणे

पिंपरी : लग्नाच्या आमिषाने महिलेचा छळ

अमृता चौगुले

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून एकाने कंपनीतील सहकारी महिलेचा लैंगिक छळ केला. हा प्रकार 23 फेब्रुवारी 2020 ते 8 जून 2022 या कालावधीत महाळुंगे येथे घडला. भगवान राम बिरादार (रा. रुपीनगर, पुणे. मूळ रा. लातूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने मंगळवारी (दि. 28) चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे चाकण येथील एकाच कंपनीत काम करत होते. दरम्यान, आरोपीने फिर्यादी महिलेसोबत मैत्री करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवले. त्यांनतर लैंगिक छळ करून महिलेला 'लग्न करणार नाही, तुला काय करायचे ते कर', अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT