पुणे

पिंपरी : रस्त्याच्याकडेला कचरा टाकल्याने दुर्गंधीचा त्रास

अमृता चौगुले

पिंपरी : काही नागरिक रस्त्याच्या बाजूला कचरा टाकतात. पावसामुळे कचर्‍याचा चिखल होऊन दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होत आहे, अशी तक्रार जनसंवाद सभेत नागरिकांनी केली. सर्व 8 क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी (दि.11) जनसंवाद सभा झाली. त्यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 6, 5, 4, 8, 10, 2, 13 आणि 6 असा एकूण 54 नागरिकांनी सुमारे 75 तक्रारी मांडल्या. तसेच, ड्रेनेज लाईनची कामे तातडीने पूर्ण करा.

पाणीपुरवठा योग्य दाबाने करा. रस्ता रुंदीकरण करा. सुलभ शौचालयांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करा. रस्त्यावरील पार्किंग ठिकाणी कायमस्वरूपी लावण्यात आलेली वाहने जप्त करा, अशा तक्रारी सभेत करण्यात आल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी अनुक्रमे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर उपस्थित होते. अधिकार्‍यांनी तक्रारींवर तातडीने उपाययोजना करण्याचा सूचना केल्या आहेत.

SCROLL FOR NEXT