पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महिलेला बंदुकीचा धाक दाखवून तिला मारहाण व शिवीगाळ केली. तसेच, तिच्यासोबत काढलेले फोटो गल्लीतील मुलांना दाखवून विनयभंग केला. ही घटना शितळानगर, देहूरोड येथे घडली. अर्जुन शशी सप्पागुरू (21, रा. शितळानगर, देहूरोड) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रस्त्याने जात असताना आरोपीने त्यांना अडवले. बंदुकीचा धाक दाखवून, तू माझ्यासोबत राहणार नाहीस, तर तुला जिवंत राहण्याचा काहीच अधिकार नाही, अशी धमकी दिली. दरम्यान, 14 ऑगस्ट रोजी आरोपीने महिलेच्या हातातील मोबाईल ओढून मारहाण व शिवीगाळ केली. तसेच, 18 ऑगस्ट रोजी आरोपीने त्याच्या मोबाईलमध्ये महिलेसोबतचे फोटो परिसरातील मुलांना व मित्रांना दाखवून त्यांचा विनयभंग केला. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.