पुणे

पिंपरी : ‘पैसे काढून देतो’, असे सांगून चाळीस हजारांची फसवणूक

अमृता चौगुले

पिंपरी : एटीएममधून पैसे काढून देतो, असे सांगून 40 हजारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी उत्तम हिरालाल कलाल (वय 55, रा. समर्थ हौसिंग सोसायटी बिल्डिंग, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उत्तम कलाल हे चिंचवड येथील एटीएममध्ये गेल्यानंतर आतमधील दोन तरुणांनी पैसे काढून देतो, असे सांगत त्यांचे कार्ड घेतले.

त्यानंतर पैसे निघत नाहीत, असे सांगत त्यांना बंद एटीएम कार्ड परत केले. फिर्यादी बाहेर पडल्यानंतर त्यांना चाळीस हजार रुपये अकाउंटमधून कपात झाल्याचा मेसेज आला.

खराब कार्ड परत करतात
अशिक्षित बँकनागरिकांचा अचूक वेध घेत ही टोळी मदत करण्याच्या बहाण्याने ग्राहकाचे एटीएम कार्ड मागून घेतात आणि जाताना ग्राहकाच्या हाती त्याच कंपनीचे बंद पडलेले दुसरे एटीएम कार्ड देतात. पैसे निघत नाहीत, म्हणून ग्राहक एटीएम बाहेर पडताच भुरटे चोर ग्राहकाच्या मूळ एटीएम कार्डचा वापर करीत अकाउंटवर डल्ला मारतात.

SCROLL FOR NEXT