पुणे

पिंपरी : थकबाकी न देणार्‍या युवकाचे अपहरण

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: पूर्वीच्या चिकन व्यवसायाचे तीन लाख रुपये थकबाकी दिली नाही म्हणून पाच जणांच्या टोळक्याने युवकाला मारहाण करत त्याचे अपहरण केले. ही घटना गुरुवारी (दि.9) दुपारी साडेतीनच्या सुमारास भक्ति-शक्ति चौकाकडे जाणार्‍या तळवडे सर्व्हिस रोडवर येथे घडली.

याप्रकरणी राकेशसिंग राजेंद्रसिंग ठाकुर (वय 33, ज्ञानेश्वर काळभोर चाळ, दुर्गानगर चौक, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात शुक्रवार (10 रोजी) फिर्याद दिली. त्यानुसार विकी बाळासाहेब झांबरे (वय 28), उदय रंगनाथ तिराळे (वय 25), सोमनाथ भेरु काळभोर (वय 30), रवी वसंत ठाकुर ( वय 19 सर्व रा. झांबरेवस्ती, उरुळीदेवाची हडपसर), पवन विलास महाजन (वय 30, रा. गायकरवाडी, हडपसर) यांना अटक केली आहे.

फिर्यादी राकेशसिंग हा गुरुवारी तळवडे येथून दुचाकीवरुन जात असताना, आरोपीने त्यास पूर्वीच्या चिकन व्यवसायाचे तीन लाख रुपये थकबाकी दिली नाही, या कारणावरुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. आरोपींनी त्यांच्या चारचाकीत फिर्यादी राकेशसिंग याला जबरदस्तीने होळकरवाडी, हडपसर येथील पोल्ट्रीफॉर्मवर घेऊन गेल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व आरोपी अटक आहेत. निगडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT