पुणे

पिंपरी : त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

अमृता चौगुले

पिंपरी : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बालाजीनगर, वराळे येथे घडली. नम्रता बोर्डे (18, रा. वराळे, रा. मावळ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या आईने तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, पती समाधान मधुकर बोर्डे (22, रा. बालाजीनगर, वराळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान आणि नम्रता यांचे 15 फेब्रुवारी 2022 रोजी लग्न झाले होते. दरम्यान, एक महिन्यानंतर घरकाम काम, स्वयंपाक नीट जमत नाही. आई वडिलांशी बोलत नाही, अशा कारणांवरून आरोपीने विवाहितेला शिवीगाळ, मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, तिच्याशी अबोला धरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. शेवटी या त्रासाला कंटाळून विवाहितेने 26 जून रोजी राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT