पुणे

पिंपरी : तरुणाचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावला

अमृता चौगुले

पिंपरी : बावधन येथे आईची वाट पाहत थांबलेल्या तरुणाचा मोबाईल फोन तीन चोरट्यांनी हिसकावून नेला आहे. ही घटना शुक्रवार (5 रोजी) रा. बावधन येथील निसान सर्व्हिस शोरूमसमोर घडली आहे. प्रद्युम्न अनिलकुमार काळगी (वय 23, रा. सुतारवाडी, बावधन बुद्रुक) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवारी रात्री मुंबईवरून पुण्याला आले. रात्री पावणे बारा वाजता बावधन येथील निसान शोरूमसमोर ते उतरले. त्यांच्या आईची वाट पाहत थांबले असताना एका दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी 10 हजारांचा मोबाईल फोन फिर्यादीच्या हातातून हिसकावून नेला आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT