पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड शहरात आज (दि. ४) काही शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करीत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
शहरातील माध्यमिक विभागाच्या शाळा दुपारच्या सत्रात भरल्या. शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सॅनिटायजर देऊन आणि तापमान मोजून शाळेत प्रवेश दिला.
विद्यार्थ्यांनी देखील मुख्याध्यापकानी दिलेल्या सूचनांचे पालन केले. शाळा सूरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मित्र मैत्रिणीची भेट झाल्याचा आनंद दिसत होता. खूप दिवसांनी भेट झाल्यावर गप्पा रंगल्या.
यावेळी एक बाकावर एक विद्यार्थी असे कोरोनाच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना वर्गात बसविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी खूप दिवसांनी शाळा पाहायला मिळाली आणि प्रत्यक्ष शिक्षण सुरू झाले याचे खूप समाधान वाटत आहे, अशी भावना व्यक्त केली.