पुणे

पिंपरी : जनरेटर नसल्याने तहसील कार्यालयात गैरसोय

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या इमारतीत असलेले तहसील कार्यालय नव्याने निगडीतील फ क्षेत्रीय कार्यालय येथे सुरू झाले आहे. मात्र, या कार्यालयात जनरेटर नसल्याने लाईट गेल्यानंतर काम ठप्प होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

तहसील कार्यालयात जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी, रहिवासी दाखला, आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यापूर्वी हे कार्यालय आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या नवीन इमारतीत होते.

नव्याने ते निगडीतील प क्षेत्रीय कार्यालय येथे एक ऑगस्टपासून सुरू झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय सुरू झाल्याने नागरिक सुखावले असले तरी या कार्यालयात जनरेटर नसल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.

SCROLL FOR NEXT