पिंपरी : सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणार्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. 14) स्पाईन रोड, एमआयडीसी भोसरी येथे कारवाई करण्यात आली. लियाकत हुसेन जाकीर खान (36, रा. चिखली. मूळ रा. राजस्थान), तुकाराम (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील लियाकत याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक दादा धस यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी लियाकत याने तुकाराम याच्याकडून गांजा घेऊन स्पाईन रोडवरील मटेरियल गेटजवळ असलेल्या उड्डाणपुलाखाली बसून ओढला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून लियाकत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार ग्राम गांजा आणि गांजा ओढण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.