पुणे

पिंपरी : गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

अमृता चौगुले

पिंपरी : महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 14) सकाळी मोशी येथे उघडकीस आली.
सुलोचना नामदेव लेकुडवार (30,रा. गायकवाड वस्ती, मोशी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

सुलोचना यांच्या पतीने दोन वर्षापूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर महिला लातूरहून पिंपरी चिंचवड शहरात आली होती. शहरात आल्यानंतर ती हाऊस किपिंग आणि जेवण बनविण्याचे काम करीत होती. तिला चार मुली असून त्या गावाकडे शिकण्यास आहेत. दरम्यान, तिने गुरुवारी सकाळी आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

SCROLL FOR NEXT