पुणे

पिंपरी : कोरोनाबाधितांचा आकडा वाढला

अमृता चौगुले

पिंपरी : कोरोना बाधित रुग्णांची संख्या बुधवारी (दि. 22) 106 वर जाऊन पोहचली. शहरातील रुग्णालयांमध्येही उपचार घेणारे रुग्ण हळूहळू वाढू लागले आहे. सध्या 15 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आठवडाभरापूर्वी म्हणजे 16 तारखेला एकाही बाधित रुग्णावर रुग्णालयात उपचार केले जात नव्हते. मात्र, आठवडाभरात ही संख्या 15 पर्यंत जाऊन पोहचली आहे. त्याशिवाय, आठवडाभरापूर्वी केवळ 372 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत होते. त्यामध्ये जवळपास 62 टक्के वाढ झाली आहे.

हा आकडा आता 600 रुग्णसंख्येवर जाऊन पोहचला आहे. आज दिवसभरात 858 संशयित रुग्णांवर कोरोना चाचणी करण्यात आली. तर, 59 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सक्रिय रुग्णांचा चढता आलेख
दिनांक गृहविलगीकरणात उपचार रुग्णालयांमध्ये उपचार
16 372 –
17 420 1
18 440 2
19 504 2
20 535 2
21 556 12
22 600 15

SCROLL FOR NEXT